Sat, Sep 21, 2019 04:24होमपेज › Solapur › तोतया पोलिसाविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल

तोतया पोलिसाविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल

Published On: Dec 01 2017 11:16PM | Last Updated: Dec 01 2017 11:09PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

आरपीएफचा पोलिस असल्याचे सांगून आचार्‍याला चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी देऊन 30 हजार रुपये घेऊन आणखी खंडणी मागणार्‍या चौघांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशिकांत गायकवाड, भैया भंडारे, रोहित गायकवाड (बंडगर), अविनाश प्रकाश जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत विजयकुमार सिद्धाराम निगार (रा. माळीनगर, एमआयडीसी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शशिकांत गायकवाड व त्याच्या साथीदारांनी विजयकुमार निगार याने घेतलेल्या जुन्या फॅनबाबत तो चोरीचा असून अक्षय गायकवाड यास पोलिसांनी अटक केली आहे, असे सांगितले. अक्षय गायकवाड यास सोडविण्यासाठी निगार यास दमदाटी करून पैशाची मागणी करून त्याच्याकडून 20 हजार रुपये घेतले. याच कारणावरून अविनाश जाधव या तोतयाने मी आरपीएफचा पोलिस आहे, असे सांगून निगार याच्याकडून दमदाटी करून मी तुला व आई, भाऊ, बहीण यांनासुद्धा चोरीच्या गुन्ह्याखाली अटक करतो, असे सांगून 30 हजार रुपये घेतले. म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक भालशंकर तपास करीत आहेत.