होमपेज › Solapur › एक हजाराची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ अटक

एक हजाराची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ अटक

Published On: Jan 23 2018 1:10AM | Last Updated: Jan 22 2018 11:04PMकुर्डुवाडी : प्रतिनिधी

एक हजार रुपयांची लाच घेताना तलाठ्यास रंगेहाथ पकडल्याची घटना लऊळ (ता. माढा) येथे सोमवारी दुपारी घडली आहे.  राजकुमार गुरुबाळ कोळी (वय 40) अशी अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

याबाबतची तक्रार सुधीर भीमराव गणगे यांनी लाचलुचपत कार्यालयाकडे मोबाईल अ‍ॅपवरून केली होती. त्यानुसार लऊळचे तलाठी राजकुमार कोळी याला लऊळ तलाठी कार्यालयात लाच स्वीकारताना पकडले.

भेंड सज्जाचा समावेश पडसाळी कार्यालयात असून त्याचा कारभार लऊळचे तलाठी कोळी यांच्याकडे काही दिवस होता. या काळात तक्रारदाराचे वडील व चुलते यांच्यामध्ये मौजे भेंड (ता. माढा) येथील जमीनचे रजिस्टर वाटप पत्र केले असून त्याबाबतची कागदपत्रे तलाठी सज्जा पडसाळी यांच्याकडे दिली आहेत. त्याप्रमाणे फेरफार 
नोंद करून 7/12 उतारा देण्यासाठी तलाठी कोळी हे लाचेची मागणी करीत होते. त्यावरून पडताळणी करून सापळा रचण्यात आला होता. ही कारवाई सोलापूर येथील लाचलुचपत कार्यालयाचे उपअधीक्षक अरुण देवकर यांच्या टीमने केली आहे.