Wed, Jul 17, 2019 20:03होमपेज › Solapur › लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी जनसागर लोटला

लोकनेत्याला आदरांजली वाहण्यासाठी जनसागर लोटला

Published On: Aug 15 2018 1:27AM | Last Updated: Aug 14 2018 10:51PMलातूर : प्रतिनिधी

मराठवाड्याच्या विकासात मोलाचे योगदान देणारे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा सहावा स्मृतिदिन शहर व जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. विलासरावांना आदरांजली वाहण्यासाठी बाभळगावात जनसागर लोटला होता.

 बाभळगाव येथे विलासरावांच्या समाधीस्थळी देशमुख परिवाराच्या वतीने प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी वैशालीताई  देशमुख, दिलीपराव देशमुख, आमदार अमित, धिरज, सुवर्णा देशमुख,  गौरवी देशमुख-भोसले, दीपशिखा देशमुख, अभिजित देशमुख, सत्यजित देशमुख यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 

यानंतर काँग्रेस पक्षासह विविध पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, शासकीय अधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिकांनी लोकनेत्यास अभिवादन केले. आमदार त्र्यंबक भिसे, यशवंत पाटील, मोईज शेख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, ललितभाई शहा, मनोज पाटील, पापा मोदी, आबासाहेब पाटील, धनंजय देशमुख, श्रीपतराव काकडे, हरीराम कुलकर्णी आदींसह हजारो नागरिकांनी या लाडक्या नेत्यास आदरांजली वाहिली. 

दरम्यान, आयएमएच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर व जिल्ह्यातील दोनशे रुग्णालयात तीनशेपेक्षा अधिक डॉक्टरांनी रुग्णावर उपचार केले. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिराचे उद्घाटन आमदार त्र्यंबक भिसे यांच्या हस्ते झाले. बँकेचे चेअरमन अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, संचालक एस. आर. देशमुख, नाथसिंह देशमुख, यशवंत पाटील, संभाजी सुळ, अ‍ॅड. प्रमोद जाधव, एन. आर. पाटील, सुधाकर रुकमे, भगवानराव पाटील, स्वयंप्रभा पाटील,  शिवकन्या पिंपळे, कार्यकारी संचालक हणमंत जाधव आदी उपस्थित होते. मनपा, बाजार समितीच्यावतीनेही अभिवादन करण्यात आले.

जागृती साखर कारखान्यावर कारखान्याच्या चेअरमन गौरवी भोसले-देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी दिलीपराव देशमुख, कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, संचालक दिलीप माने, कर्वा सूर्यकांत, संभाजी रेड्डी, कार्यकारी संचालक सुनील देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील, सतीश पाटील, संचालक, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.