होमपेज › Solapur › लावणी सम्राट वैशाली जाधवची लावणी राष्ट्रीय थिएटर ऑलिम्पिकमध्ये

लावणी सम्राट वैशाली जाधवची लावणी राष्ट्रीय थिएटर ऑलिम्पिकमध्ये

Published On: Apr 12 2018 10:30PM | Last Updated: Apr 12 2018 9:26PMअकलूज : वार्ताहर

मोडनिंबच्या नटरंग कला केंद्रातील कलाकारांनी दिल्लीत मराठमोळी  लावणी सादर करून दिल्लीकरांची तर मने जिंकलीच परंतु  दिल्ली 8 थिएटर ऑलिंपिक राष्ट्रीय नाट्य विद्यालय या मोठ्या सोहळ्यामध्ये आशा रुपा परभणीकर  या पारंपरिक संघाला आपली कला सादर करण्यांची संधी मिळाली.

 25 मार्च रोजी दिल्ली येथे इंडिया गेट जवळ कमानी ओडिटेरीयम येथे आशा रुपा परभणीकर या संघाच्या लावणी कार्यक्रमाचे सादरीकरण मोठ्या थाटात पार पडले. तर मुंबई येथे 8 एप्रिल रोजी या कार्यक्रमाची सांगता वैशाली जाधव व त्यांच्या सहकार्‍यांच्या लावणी सादरीकरणाने झाली.  यापूर्वी या संघाने महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग व खा. विजयसिंह मोहीते -पाटील व जयसिंह मोहीते -पाटील यांच्या सहकार्याने 2007 साली अमेरीकेत न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी येथे लावणीचे 8 प्रयोग सादर करण्याचा मान मिळवले.  

 अकलूज राज्य स्तरीय लावणी स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष प्रथम क्रमांक मिळवून विजयाची हॅटट्रिक केली. अकलूज महाविजेता राज्यस्तरीय लावणी स्पर्धेमधे प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य लावणी महोत्सवात 7 वर्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट मुंबई येथे लावणीचे प्रयोग केले.  

8 थिएटर ऑलिम्पिकची सुरूवात 17 फेब्रुवारीला दिल्ली येथे इंडिया गेटला तर  शेवट 8 एप्रिल गेट ऑफ  इंडिया मुंबई येथे झाला. यामध्ये नाना पाटेकर, नवाजुदीन सिद्दीकी असे अनेक मराठी व हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत या 8 एप्रिल च्या मुबंई येथील कार्यक्रमाला उपस्थित होते.त्यामध्येही आशा रुपा परभणीकर या संघाला लावणी सादर करण्यांचा मान मिळाला आहे. या लावणी संघाने आज पर्यंत 2003 ते 2018 पर्यंत 151 प्रयोग केले आहेत.