Mon, Apr 22, 2019 06:11होमपेज › Solapur › सोलापूर : कर्तव्यात कसूर; पाच पोलिस निलंबित

सोलापूर : कर्तव्यात कसूर; पाच पोलिस निलंबित

Published On: Dec 23 2017 7:00PM | Last Updated: Dec 23 2017 7:00PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या तीन सहायक फौजदारांसह पाच पोलिस कर्मचार्‍यांना पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी निलंबित केले. जिल्हा न्यायायातील सत्र न्यायाधीशांच्या कोर्ट हॉलमध्ये जाऊन कुर्‍हाड उगारुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला होता. पोलिसांवरील या कारवाईमुळे पोलिस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सहायक  फौजदार  वसंत चिंतामणी जैन (नेमणूक- विजापूर नाका  पोलिस ठाणे), सहायक  फौजदार राम मल्लिकार्जुन पालवे (नेमणूक- फौजदार  चावडी पोलिस ठाणे), सहायक फौजदार भीमाशंकर मारुती वाघे (नेमणूक- पोलिस मुख्यालय, सोलापूर शहर), पोलिस हवालदार अशोक बाबुराव पाटील (ब. नं. 232, नेमणूक- एमआयडीसी पोलिस ठाणे), पोलिस हवालदार ज्ञानदेव खंडू कोळेकर (ब. नं. 491, नेमणूक- जेलरोड पोलिस ठाणे) अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.