Thu, Apr 25, 2019 03:44होमपेज › Solapur › लातूरात आले जगातील पहिले रेल्वे रूग्‍णालय

लातूरात आले जगातील पहिले रेल्वे रूग्‍णालय

Published On: Jun 13 2018 8:27PM | Last Updated: Jun 13 2018 8:47PMलातूर । प्रतिनिधी

जगातील पहिले चालते –फिरते रुग्णालय असलेली जीवन रेखा एक्सप्रेस (लाईफ लाईन एक्सप्रेस ) ही रेल्वे लातूर रेल्वे स्थानकावर आली असून, या रुग्णालयामार्फत् १६ जून ते ६ जुलै  या कालावधीत जिल्हयातील गरजू रुग्णांना मोफत आरोग्यसेवा दिली जाणार आहे.  

या रेल्वेमध्ये आरोग्य तपासणीच्या अद्यायावत सुविधा आहेत.  या सेवेचे उद्घाटन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते व खासदार सुनील गायकवाड यांच्या उपस्थितीत १६ जून रोजी होणार आहे.  नेत्र, कान,कर्करोग, स्त्रीरोग, जळीत रु्ग्ण, पोलिओ, मिर्गी, मधुमेह या सारखे आजाराने त्रस्‍त असलेल्‍या  रुग्णांची तपासणी करुन उपचार केले जाणार आहेत. गरज असलेल्या रुग्णांवर शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत

 काय आहे लाईफ लाईन एक्सप्रेस.....

केंद्रीय आरोग्य विभाग व इम्पॅक्ट फाऊंडेशन इंडिया यांच्या  सहकार्याने रेल्वे विभागाने १६ जुलै १९९१ रोजी लाईफ लाईन एक्सप्रेस या चालत्या –फिरत्या जगातील एकमेव रुग्णालयाची स्थापना केली. या एक्सप्रेसने २७ वर्षांत जवळपास २०  राज्यातील १९३ जिल्हयातील रेल्वे स्थानकात जाऊन त्या जिल्हयातील गरजू रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा पुरविल्या आहेत. १० लाखापेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करुन १ लाख २० हजार पेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रियाही केल्या आहेत. डोळे, कान, तोंडाचा कॅन्सर, स्तन व गर्भाशय कॅन्सर, फाटलेले ओठ, पोलिओ, कुटुंब नियोजन आदि रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार व शस्त्रक्रिया नि:शुल्क केली जाते. या रेल्वे रुग्णालयात २० अधिकारी व कर्मचारी असून या माध्यमातून देशभरातून ५० ते ६० वरिष्ठ तज्ञ वैदयकीय अधिकारी बोलावून स्थानिक स्तरावर त्यांची आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिली जाते.