होमपेज › Solapur › पहिला हप्ता ठरल्याप्रमाणे न दिल्यास कारखान्याचे धुराडे बंद पाडू : खा. शेट्टी

पहिला हप्ता ठरल्याप्रमाणे न दिल्यास कारखान्याचे धुराडे बंद पाडू : खा. शेट्टी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





करकंब : वार्ताहर

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एफ. आर. पी. अधिक 400 रूपयांचा पहिला हप्ता पुढच्या आठ दिवसात न दिल्यास धुराडे बंद पाडू. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी दिला. 

उंबरे (पागे) येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या सभेत खा. शेट्टी बोलत होते.  यावेळी जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, नवनाथ माने, चंद्रकांत बागल, माजी उपसभापती विष्णु बागल, महामुद पटेल, विजय रणदिवे, तानाजी बागल, सचिन पाटील, विश्रांती भुसनर, अमर इंगळे, नितीन बागल आदीसह उंबरे, करोळे, कान्हापुरी, जळोली, सांगवी, पेहे, नांदोरे आदी भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना खा. शेट्टी म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आता संघर्ष करण्याची वेळ आली आहे. अन्याय सहन करायचा नाही. साखर उतारा कमी दाखवून एक प्रकारे कारखानदार उतार्‍याची चोरी करीत आहेत.  यापुढील काळात साखर कारखानदारांची संपत्ती जाहीर करावी. तसे न झाल्यास आयकर विभागाच्या कार्यालयांवर मोर्चा काढू असेही खा. शेट्टी म्हणाले.

यावेळी रविकांत तुपकर यांनी आक्रमक पवित्रा घेत योग्य दर मिळविण्यासाठी व आंदोलनासाठी पुन्हा तयार राहण्याचे आवाहन शेतकर्‍यांना केले.