Fri, May 24, 2019 21:04होमपेज › Solapur › नागफणी नंदी ध्वजाने घेतला पेट 

नागफणी नंदी ध्वजाने घेतला पेट 

Published On: Jan 14 2018 11:21PM | Last Updated: Jan 14 2018 11:21PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

नागफणी नंदी ध्वज व मानाच्या सातही काठ्या होमहवन सोहळ्यासाठी जात असताना आजोबा गणपती जवळ विजेच्या तारांचा स्पर्श झाला. त्यामुळे नंदीध्वज धारकांना जोराचा धक्का बसला. विजेच्या धक्क्क्याने तोल जाऊन नागफणी नंदी ध्वजजवळ असलेल्या विजेच्या डीपीवर कोसळली. ही घटना रविवारी रात्री ९ .३० च्या सुमारास घडली.

हिरेहब्बू वाड्यातून हे नंदी ध्वज मिरवणूक मार्गाने जात असताना हा अनर्थ झाला. होमहवन विधीला प्रथम काठी किंवा नागफणी काठी सोमनाथ मेंगाने हे मानकरी धरतात. दिवसभर उपाशी राहून एकटेच काठी पकडून होम मैदानावर घेऊन जातात.

या अपघातात काठीचे थोडेफार नुकसान झाले. मानकरी यांनी लगेच काठी बदलली व पुन्हा होमहवन विधीसाठी मार्गस्थ झाली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. भक्तांई कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे ही आवाहन करण्यात आले आहे.