Thu, Apr 25, 2019 07:45होमपेज › Solapur › हिरज परिसरात वनक्षेत्रात वणवा

हिरज परिसरात वनक्षेत्रात वणवा

Published On: Apr 15 2018 11:02PM | Last Updated: Apr 15 2018 9:22PMसोलापूर: प्रतिनिधी

हिरज परिसरातील व विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेले वनपरिक्षेत्र व सरपटणार्‍या प्राण्यांचा अधिवास असलेल्या परिसरात रविवारी दुपारी वणवा पेटला. सुमारे 20 ते 22 एकरांपर्यंत वनक्षेत्र परिसर जळून खाक झाले आहे.वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी वेळीच तत्परता दाखविली असती, तर आगीला वेळीच नियंत्रणात व आटोक्यात आणले असते, अशी माहिती प्रामिमित्रांनी दिली.

दुपारी 2 च्या सुमारास कडक उन्हात हिरज परिसरातील व  सोलापूर विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेेल्या वनक्षेत्र परिसरातील वणवा पेटला होता.नेचर कंझर्वेशनच्या  सदस्यांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. वन रक्षक बनसोडे यांना याबाबतची माहिती दिली. परंतु, वन विभागाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पर्यावरणप्रेमी व प्राणिमित्रांनी स्वतः अग्निशमन दलास माहिती दिली. परंतु, वन विभागाचे राखीव क्षेत्र असल्याने अग्निशमन दलाने नियमानुसार काम करण्याचा सल्ला दिला. वन विभागाचे फोन येऊ द्या, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.

फॉरेस्ट लँड एरियामध्ये लागलेल्या वणव्याला विझवण्यासाठी वेळीच हालचाली झाल्या असत्या तर  कमी क्षेत्र जळाले असते.व आग आटोक्यात आली असती.अग्निशामक दलाची गाडी सुमारे दीड तास उशीरा आल्याने आगीने 20 ते 25 एकर परिसराला आपल्या कवेत घेतले.

परिसरात पावसाच्या आगमनाने आग विझण्यास मदत झाली.एकच बंब ही आग विझवण्यासाठी लागले.ही आग कशामुले लागली त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.