Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Solapur › सोलापूर : बसपा नेत्यांची पोलिसांना धक्काबुक्की

सोलापूर : बसपा नेत्यांची पोलिसांना धक्काबुक्की

Published On: Jan 10 2018 11:57AM | Last Updated: Jan 10 2018 11:57AM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

बहुजन समाज पक्षाचा नेता असल्याचे सांगून  पोलिस उपनिरीक्षकांना धक्काबुक्की करणार्‍या तिघांविरुध्द मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तिघांना अटक करण्यात आली आहे.

अमर  मधुकर  ससाणे (रा. सिध्दार्थ नगर, मोहोळ सध्या तडगावशेटी, ग्रीनथींक हॉटेलसमोर, बोराटे चाळ, पुणे), अविनाश मधुकर ससाणे (रा. सिध्दार्थ नगर, मोहोळ), हरि आप्पा क्षिरसागर (रा. सिध्दार्थ नगर, मोहोळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक विष्णु साहेबराव गायकवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. अमर ससाणे हा बहुजन समाज पार्टीचा पुण्याचा पदाधिकारी असून त्याच्यावर मोहोळ पोलिस ठाण्यात यापूर्वीही गुन्हा दाखल झालेला आहे.

पोलिस उपनिरीक्षक विष्णु गायकवाड यांनी रात्री कुरूल रोडवर संशय आल्याने एक पांढर्‍या  रंगाची  स्विफ्ट  कार अडविली. गाडीमध्ये असलेल्या लोकांना पोलिस उपनिरीक्षक  गायकवाड यांनी त्यांचे नाव व पत्ता विचारला. त्यावेळी गाडीतील लोकांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन नाव व पत्ता सांगण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक गायकवाड यांनी त्यांना पुन्हा नाव विचारले. त्यानंतर  त्यातील एकाने ‘मी बहुजन समाज पार्टीचा नेता असून मी काहीही करेन, मला विचारणारा तू कोण?’ असे म्हणून शिवीगाळ करुन दमदाटी केली आणि पोलिस  उपनिरीक्षक गायकवाड यांना धक्का मारला. त्यानंतर पलिसांनी गाडीतील तिघांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून मोहोळ पोलिस  ठाण्यात  गुन्हा  दाखल केला.  पोलिस  उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.