होमपेज › Solapur › बार्शीच्या ‘म्होरक्या’ची राष्ट्रीय पुरस्कारातही बाजी, बार्शीत आनंदोत्सव

बार्शीच्या ‘म्होरक्या’ची राष्ट्रीय पुरस्कारातही बाजी, बार्शीत आनंदोत्सव

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 11:07PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

यापूर्वी अनेक स्थानिक पुरस्कारांचा मानकरी ठरलेल्या बार्शी येथील कलाकारांचा ‘म्होरक्या’ राष्ट्रीय स्तरावरसुद्धा म्होरक्या ठरला असून 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर म्होरक्याने आपलं नाव कोरलं आहे.दिग्दर्शक अमर देवकर यांना विशेष कामगिरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. म्होरक्या पुरस्काराच्या यादीत गेल्याच्या वृत्ताने बार्शी शहर, पांगरी, वैराग आदी तालुक्यातील अनेक गावातील कलाप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला.  ‘म्होरक्या’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच या चित्रपटाने अनेक पुरस्कारांची कमाई केलेली होती.कोलकत्ता इंटरनॅशनल कल्चरल फिल्म फेस्टीव्हल (कोलकत्ता) येथेही या चित्रपटाने बाजी मारत देवकर यांना उत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झालेला होता. तसेच पुणे येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही म्होरक्यांने आपली मोहोर लावली होती. 

देवकर यांनी अनेक वर्ष चित्रपट पाहून, अभ्यासून दिग्दर्शक होण्याचा प्रवास सुरू ठेवला. बार्शी परिसर व सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांचा समावेश असलेला हा चित्रपट आहे. ‘म्होरक्या’ या चित्रपटासाठी कल्याण पडाल, युवराज सरवदे, अमर देवकर, निलेश रसाळ, गिरीश जांभोळीकर, अतुल लंजुडकर, दर्शन शिवले, अतुल लोखंडे, शिवाजी करडे, आदित्य बिडकर, उमेश मालन, अभय चव्हाण, शुभम गोणेकर, रमण देवकर, रामचंद्र धुमाळ, सुरेखा गव्हाणे, अनिल कांबळे, ऐश्‍वर्या कांबळे, यशराज कर्‍हाडे यांनी आपल्या कलेचा कस लावून यश मिळवले. 

Tags : Mhorkya Marathi Movie, film award