Thu, Jul 18, 2019 14:24होमपेज › Solapur › पत्नीचा छळ करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा

पत्नीचा छळ करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यावर गुन्हा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

चारित्र्याच्या संशयावर पत्नीचा छळ  करणार्‍या पोलिस कर्मचार्‍याविरुद्ध एमआयडीसी पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.मनेष रामचंद्र माने (ब. नं. 1052, नेमणूक- पोलिस मुख्यालय, सोलापूर  शहर, वय 32, रा. न्यू पाच्छा पेठ, भावनाऋषी    हॉस्पिटलजवळ) असे गुन्हा   दाखल झालेल्याचे  नाव आहे. याबाबत  सुप्रिया मनेष माने (28) या विवाहितेने फिर्याद दाखल केली आहे.

सोलापूर शहर पोलिस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या पोलिस शिपाई मनेष माने याचा विवाह सुप्रिया हिच्याशी 17  फेब्रुवारी 2009 रोजी झाला आहे. लग्नानंतर सुप्रिया ही  नांदण्यास असताना मनेष माने हा तिच्या चारित्र्यावर  सतत संशय घेऊन तिला तू व  तुझ्या घरातील लोक चांगले नाहीत असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करीत होता.

18 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी मनेर्ष माने याने सुप्रिया हिस तुझे वडील सेवानिवृत्त झालेत, मला कर्ज खूप झाले आहे, ते फेडण्यासाठी तुझ्या वडिलांना मला पैसे द्यायला सांग, असे म्हणून शिवीगाळ व मारहाण कन तिला घरातून हाकलून दिले. 

त्यामुळे सुप्रिया माने तिच्या वडिलांकडे मुंबईला माहेरी गेली. त्यानंतर तिने ही बाब तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर याबाबत फिर्याद दाखल केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक कोल्हाळ तपास करीत आहेत.