Thu, Jun 27, 2019 17:49होमपेज › Solapur › लग्नासाठी मुलगी देत नाही म्हणून वडिलांचा खून

लग्नासाठी मुलगी देत नाही म्हणून वडिलांचा खून

Published On: Apr 21 2018 12:15AM | Last Updated: Apr 21 2018 1:04AMपंढरपूर : प्रतिनिधी 

लग्नासाठी मुलगी  देत नाही या कारणावरून तिच्या वडिलांचा कुर्हाडीने घाव घालून खून करण्यात आला तर आईला गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना शुक्रवारी पहाटे दीड च्या सुमारास रांझणी ( ता.पंढरपूर )  येथे घडली.मधुकर निलाप्पा पवार (वय ५५, रा.रांझणी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव आहे.

याबाबत चे सविस्तर वृत्त असे कि, याप्रकरणी नवनाथ शिवलिंग भोसले, महालिंग शिवलिंग भोसले, नारायण शितोळ्या भोसले व किशोर महालिंग भोसले (सर्व रा. नेपतगांव) यांच्या विरूद्ध तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. 

मयत मधुकर पवार यांच्या अल्पवयीन मुलीबरोबर यातील नवनाथ भोसले याला लग्न करावयाचे होते. मात्र मुलगी लहान असल्याने ती देण्यास पवार हे नकार देत होते. याचा राग मनात धरून कुर्हाडीने हल्ला चढवून मधुकर पवार व त्यांची पत्नी सुरेखा पवार यांना गंभीर जखमी केले. सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना मधुकर पवार यांचा मृत्यू झाला. उशिरा याप्रकरणी उमेश मधुकर पवार यांनी तालुका पोलिसांत फिर्याद दाखल केली. अधिक तपास पोलीस निरीक्षक के.के. खराडे करीत आहेत.