होमपेज › Solapur › जमिनीचे क्षेत्र कमी केल्याने शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न 

जमिनीचे क्षेत्र कमी केल्याने शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी 

कॅनॉलसाठी संपादित केेलेल्या जमिनीत सामुदायिक क्षेत्रातील काही क्षेत्र चुकीच्या पद्धतीने कमी केल्याने ते क्षेत्र पूर्ववत करून मिळावे या मागणीसाठी पीरटाकळी (ता. मोहोळ) येथील सोमनाथ थिटे या शेतकर्‍याने सोमवारी लोकशाहीदिनात आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याला विषारी औषधाच्या बाटलीसह ताब्यात घेतले.

सोमनाथ थिटे यांच्या पीरटाकळी येथील गट क्रमांक 151 मधील जमिनीतून कॅनॉल गेला होता. 

त्यामध्ये उर्वरित क्षेत्रातून तलाठी आणि मंडल अधिकार्‍यांनी चुकीच्या पद्धीने क्षेत्र कमी केले होते. यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही कोणी दाद देत नसल्याने त्यांनी लोकशाहीदिनात तक्रारी अर्ज दिला होता. यावेळी त्यांनी  सोबत आणलेल्या पिशवीत विषारी औषध असल्याचे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी थिटे यांना त्या विषारी औषधाच्या बाटलीसह ताब्यात घेतले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात काहीकाळ गोंधळ झाला. यावर विशेष भूसंपादन अधिकारी क्रमांक 7 व तहसीलदार मोहोळ यांच्याकडे येत्या 11 मार्च रोजी बैठक लावण्यात आली असून त्यामध्ये यावर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.


  •