Mon, Apr 22, 2019 03:42होमपेज › Solapur › वाखरीत शेतकर्‍यांचा रास्ता रोको 

वाखरीत शेतकर्‍यांचा रास्ता रोको 

Published On: Jan 10 2018 2:00AM | Last Updated: Jan 09 2018 11:35PM

बुकमार्क करा
पंढरपूर : प्रतिनिधी

वाखरी (ता. पंढरपूर)  परिसरातील शेती पंपांचा वीजपुरवठा डी. पी. बंद करून खंडीत केल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी मंगळवार (दि. 9 जाने.) वाखरी येथे पंढरपूर-पुणे पालखी मार्गावर रास्ता रोको केला. शेतकर्‍यांनी जनावरे रस्त्यावर आणून बांधली होती. सुमारे दोन तास रस्ता बंद केल्यामुळे वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता सानप यांनी गावात येऊन शेतकर्‍यांचे गार्‍हाणे ऐकून घेतले आणि आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले. 

वाखरी परिसरातील शेती पंपाचे डी.पी. थकित वीज बीलाच्या कारणावरून वीज वितरण कंपनीने उतरवले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांतून संपात व्यकत होत आहे. मंगळवारी शेतकर्‍यांनी एकत्र येऊन पंढरपूर-पुणे पालखी मार्गावर रास्ता रोको केला. यावेळी ग्रा.पं.सदस्य संग्राम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी आपली जनावरेही रस्त्यावर बांधली होती.  सुमारे दोन तास रस्ता बंद झाल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. तालुका पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी विनंती करूनही आंदोलक उठत नव्हते. अखेरीस वीज वितरणचे कार्यकारी अभियंता सानप, शाखा अभियंता हेमंत कासार यांनी आंदोलन स्थळी येऊन दररोज 2 तास शेती पंपाचा वीज पुरवठा सुरू ठेवण्याचे आश्‍वासन दिले. तसेच आठ दिवसात डि.पी.बंदचा प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील आणि जनहित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन अटकळे यांनी या आंदोलन संघटनांचा पाठींबा देऊन सहभाग घेतला.