Mon, Jun 17, 2019 03:06होमपेज › Solapur › वन टाईम सेटलमेंट कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ?

वन टाईम सेटलमेंट कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ?

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 9:38PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी    

वन टाईम सेटलमेंट योजनेंतर्गत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्‍यांना हप्ते पाडून द्यावेत जेणेकरून अधिक शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतील. त्यासाठी शेतकर्‍यांशी बँकांनी संवाद साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यामुळे दीड लाख रुपयांच्या वर कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना यामुळे मुदतवाढ मिळणार आहे. त्यामुळे कर्जमाफी योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

दीड लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांना उर्वरित रक्कम भरण्यासाठी 31 डिसेंबरपयर्र्ंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक शेतकर्‍यांकडे पैसे नसल्याने त्यांनी या योजनेतकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे एकरकमी कर्ज परतफेड योजनेला अनेक जिल्ह्यात थंडा प्रतिसाद मिळाला होता.   यामधून  नावीन्यपूर्ण अशी योजना आखावी व खातेदाराचे बँक खाते पुनर्जीवित करावे. महाराष्ट्राने आतापर्यंत कर्जमाफीचे काम देशाला पथदर्शी ठरावे इतक्या पारदर्शक पद्धतीने केले आहे. पुढेही ते याच पद्धतीने पूर्णत्वाला न्यावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी करताना बँकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षाही त्यांनी जाणून घेतल्या. 

त्यामुळे राज्यातील पात्र शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ होईल या पध्दतीने नियोजन करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.