Wed, Sep 26, 2018 14:10होमपेज › Solapur › पाण्यासाठी मंद्रूपच्या शेतकर्‍यांचे कॅनालमध्ये उपोषण 

पाण्यासाठी मंद्रूपच्या शेतकर्‍यांचे कॅनालमध्ये उपोषण 

Published On: Apr 05 2018 11:38PM | Last Updated: Apr 05 2018 11:37PMमंद्रूप (जि. सोलापूर) : प्रतिनिधी

मंद्रूप परीसरात सोडण्यात आलेले कॅनॉलचे पाणी फाटा क्रमांक १९ ते २३ ला अपुरा व कमी प्रमाणात आल्याने, पुन्हा जास्त पाणी  सोडण्यासाठी बुधवारी मंद्रूपच्या शेतकर्‍यांनी पाटबंधारे खात्याच्या अभियंता कार्यलयासमोर ठिया आंदोलन सुरु केले. गुरुवारी या शेतकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली व त्यानंतर त्यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन पाण्याविना शेतकर्‍यांची कैफीयत मांडली. त्यानंतर अधिकार्‍यांनी दोन दिवसात पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. माञ, यापूर्वी या खात्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांच्या आश्वासनावर विश्वास न ठेवता गुरुवारी राञीपासून कॅनॉलमध्येच ठिया मारुन उपोषण सुरु केले आहे. 

यावेळी उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी मंद्रूप परीसरात कमी दाबाने व कमी प्रमाणात सोडण्यात आल्याने शेतकर्‍यांनी बैठक घेऊन संताप व्यक्त केला . माञ, यावेळी मंद्रूप व वांगी शिवारात असणार्‍या परीसरात कॅनॉलचे पाणीच सोडण्यात आले नाही. म्हणून कॅनॉलच्या पाण्यापासून  वंचित असणार्‍या शेतकर्‍यांनी  गुरुवारी राञी कॅनॉलला पाणी येईपर्यंत फाटा क्रमांक २३ मध्ये ठिया मारण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात अखिल भारतीय किसान सभेचे तालुकाध्यक्ष डॉ. शिवानंद झळके, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बिळेणसिध्द सुंटे, पिंटू साठे, सूर्यकात शिंगाडे, संतोष साठे, शाम साठे, अमृता चव्हाण, सोमनाथ नवले, आकाश साठे, नागेश साठे,  हजारे यांच्यासह अनेक शेतकरी उपोषणास बसले आहेत.