Tue, Nov 20, 2018 19:44होमपेज › Solapur › मळोली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार 

मळोली येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी ठार 

Published On: May 22 2018 10:13AM | Last Updated: May 22 2018 10:13AMमळोली (जि. सोलापूर)

मळोली (तालुका माळशिरस) येथे पिपळाचा मळा या ठिकाणी अज्ञात वाहनाने धडक दिल्‍याने एका शेतकऱ्याचा मृत्‍यू झाला आहे. दादासाहेब भानुदास कळसुले पवार असे अपघातात ठार झालेल्‍या शेतकऱ्याचे नाव आहे. 

मंगळवारी (दि. २२ मे)सकाळी सहा वाजता भानुदास हे आपल्‍या रानातील घरातून मळोली गावाच्या दिशेने येत होते. यावेळी पाठीमागून येणाऱ्या वाहनाने त्यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

या घटनेचा तपास वेळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कोरके करीत आहेत

Tags : solapur district malshiras taluka, farmer, accident