Sun, Dec 16, 2018 22:54होमपेज › Solapur › गहाण शेत सोडवण्यासाठी पत्नीला मारहाण

गहाण शेत सोडवण्यासाठी पत्नीला मारहाण

Published On: Jan 21 2018 2:57AM | Last Updated: Jan 20 2018 8:34PMवैराग : प्रतिनिधी

लग्नाकरीता गहाण ठेवलेले शेत सोडविण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये घेऊन ये, म्हणून शिवीगाळ व मारहाण करणार्‍या पती विरोधात पत्नीने गुरुवारी वैराग पोलिसांत तक्रार नोंद केली आहे. याबाबतची वैराग पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, श्रीपतपिंपरी (ता. बार्शी) येथील एका मुलीचा साडेचार वर्षापूर्वी विवाह तडवळे (क) (ता. जि. उस्मानाबाद) येथील नानासाहेब रामलिंग ताकभाते यांच्याबरोबर झाला आहे. दरम्यान, लग्न करण्यासाठी शेत गहाण ठेवल्याने माहेरहून दीड लाख रुपये घेऊन ये, म्हणून पती नानासाहेब पत्नीस मारहाण व शिवीगाळ करीत होता. दरम्यान, पती-पत्नीतील वाढणारा वाद कमी करण्यासाठी माहेरहून दहा हजार आणून दिले. मात्र त्यानंतर दीड महिन्यातच शेतात एका अनोळखी स्त्रीसोबत लगट करताना पत्नीने पाहिले, त्यामुळे पुन्हा तिला मारहाण आणि शिवीगाळ सुरु झाली. अशातून पतीने पत्नीस घराबाहेर हाकलून दिले. अखेर सहन न झाल्याने पती विरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.