होमपेज › Solapur › बनावट चेक देऊन दुकानदाराची फसवणूक

बनावट चेक देऊन दुकानदाराची फसवणूक

Published On: Mar 07 2018 9:35AM | Last Updated: Mar 06 2018 9:06PMसोलापूर : प्रतिनिधी  

मोबाईल खरेदी करुन बनावट चेक देत फसवणूक केल्याची तक्रार केतन महेंद्र शहा (वय 60, रा. सर्वोदय हौसिंग सोसायटी, सोलापूर) यांनी विशुध्द भालचंद्र नवाथे ( रा. शनिवार पेठ) यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पार्क स्टेडियम येथील महेंद्र इलेक्क्ट्रॉनिकमध्ये 27 फेब्रुवारी रोजी 27 हजार 980 रुपये विवो कंपनीचे दोन मोबाईल खरेदी केले होते. सुबोध जोशी असे खोटे नाव सांगून मोबाईल खरेदी केले. कर्नाटक बँकेमध्ये पुरेशी रक्कम नसताना  विशुध्द भालचंद्र नवाथे या नावे केतन शहा यांना कर्नाटक बँकेचा चेक दिला होता. हा चेक खोटा असल्याचे लक्षात आल्यावर दुकानदाराने तक्रार दाखल केली आहे. तपास पोह जाधव करत आहेत.

मोबाईल पळविला

नागेश रामलू चलवादी (वय 21, रा. भूषणनगर, वांगी रोड, सोलापूर) हे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास आईला एस.टी. स्टँडवर सोडून घरी जाताना शिवाजी चौकात एका अनोळखी इसमाने लिफ्ट मागितली. शिवगंगा मंदिरापर्यंत सोडा अशी विनंती केल्यामुळे नागेश चलवादी यांनी लिफ्ट दिली. शिवगंगा मंदिराजवळ आल्यानंतर अनोळखी इसमाने मित्राला फोन करतो म्हणून मोबाईल मागितले. मोबाईल हातामध्ये घेताच अनोळखी इसम गल्लीबोळातून पळून गेला. यामध्ये 26 हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल गेल्याची फिर्याद जोडभावी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. अधिक तपास पोह राजपूत करत आहेत.

दोन कार जाळण्याचा प्रयत्न

संजीव जयकुमार पाटील (वय 52,  रा. सिव्हिललाईन, सोलापूर) यांनी घरासमोर उभे केलेल्या दोन कार रोहित साळवी (रा. लक्ष्मी-विष्णू चाळ) याने अज्ञात कारणावरुन लोखंडी पाईपने मारून काचा फोडल्या व रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला अशी नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तपास हेकॉ. गायकवाड करत आहेत.