Wed, Jul 24, 2019 12:29होमपेज › Solapur › गुजरात एक्झिट पोल खोटे ठरतील : सुशीलकुमार शिंदे (व्हिडिओ)

"एक्झिट पोल ज्यांच्या बाजूने, त्यांना आनंद घेऊ द्या" (व्हिडिओ)

Published On: Dec 15 2017 12:28PM | Last Updated: Dec 15 2017 1:29PM

बुकमार्क करा

सोलापूर : पुढारी ऑनलाईन

गुजरातमधील एक्झिट पोल भाजपच्या बाजूने निकाल दाखवत असले तरी अशी स्थिती तिथे नाही, असा दावा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. गुजरातमध्ये काय होणार हे १८ तारखेलाच आपल्याला कळेल तोपर्यंत एक्झिट पोल ज्यांच्या बाजूने आहेत त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या, असा टोलाही शिंदे यांनी लगावला. हिमाचल प्रदेशमध्ये सातत्यानं अदलून बदलून सत्ता येत असते. तेथे काँग्रेस पक्षाचे सरकार निश्चित येईल,  असा दावाही शिंदे यांनी केला. बोरामणी येथील एअरपोर्ट कामकाज लवकर सुरू करावे, अशा मागणीचे पत्र शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे. त्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली. 

आज काँग्रेस भवन येथे सकाळी पत्रकारांशी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, 'विमानतळ व्हावे यासाठी  जागा संपादित केली. आता सध्याच्या शासनाने या कामाला गती द्यायला हवी होती. सोलापुरातील शेतीमाल फळफळावळ एक्सपोर्ट करण्यासाठी हे विमानतळ अतिशय उपयुक्त ठरणार आहे.'