Tue, Jul 23, 2019 04:24होमपेज › Solapur › सोलापूर: वीज तोडल्याने दोन अभियंत्यांसह सहा कर्मचार्‍यांना मारहाण

सोलापूर: वीज तोडल्याने दोन अभियंत्यांसह सहा कर्मचार्‍यांना मारहाण

Published On: Mar 15 2018 2:44PM | Last Updated: Mar 15 2018 3:07PMमाढा :वार्ताहर 

शेतीपंपांचे वीज कनेक्शन तोडल्या प्रकरणी उपळाई बुद्रुक येथे महाराष्ट्र वीज वितरण कंपनीच्या दोन अभियंत्यांसह, सहा कर्मचार्‍यांना स्थानिकांनी मारहाण केली. यामध्ये सहाय्यक अभियंता पी. आर. चव्हाण गंभीर जखमी झाल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पीटल सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. 

सध्या आर्थिक वर्षाखेरीमुळे महावितरणने सर्व प्रकारच्या थकबाकी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. उपळाई बुद्रुक येथे शेतीपंपाचे वीज कनेक्शन थकबाकीमुळे तोडण्यात आले होते. यानंतर थकीत बिलाच्या वसुलीसाठी महावितरणचे पथक गेले असता. पथकाला स्थानिकांनी मारहाण केली. यामधून एकूण आठ कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहायक अभियंता पी. आर. चव्हाण यांना सोलापूरला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.