Fri, Jul 19, 2019 05:00होमपेज › Solapur › सोलापूर : आयुक्तांच्या गाडीवर अंड्यांचा 'प्रहार' करण्याचा प्रयत्न(Video)

सोलापूर : आयुक्तांच्या गाडीवर अंड्यांचा 'प्रहार' करण्याचा प्रयत्न(Video)

Published On: Jul 20 2018 10:50PM | Last Updated: Jul 20 2018 11:58PMसोलापूर : प्रतिनिधी 

महापालिकेच्या उत्पन्नाचा तीन टक्के निधी दिव्यांगांच्या विविध कल्याणकारी योजनेसाठी देण्यात यावा या मागणीचे निवेदन महापालिका  आयुक्तांना देण्यास गेलेल्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना आयुक्तांनी वेळ दिला नाही. त्यामुळे प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आयुक्तांच्या विरोधात जोरात घोषणाबाजी करत आयुक्तांच्या दारावरच निवेदन डकावले. त्याची कोणतीच दखल आयुक्तांनी घेतली नाही. त्यामुळे सायंकाळी उशीरा आयुक्त महापालिकेत बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीवर अंडी फेकून आंदोलन करण्याच्या प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना ताब्यात घेतल्याने हे आंदोलन फसले.

प्रहार संघटनेचे सुमारे सात-आठ कार्यकर्ते व पदाधिकारी आज आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना निवेदन देण्यासाठी सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिकेत आले होते. मात्र त्यावेळी आयुक्त प्लास्टिक बंदीच्या बैठकीत असल्याने आयुक्तांनी त्यांना वेळ दिला नाही. आयुक्तांच्या दालनाबाहेर अर्धा एक तास वाट पाहत बसलेल्या कार्यकर्त्यांनी अखेर कंटाळून चिरडीलायेऊन आयुक्तांच्या दाराला त्यांच्या निवेदन डकावले आणि आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मात्र सुरक्षारक्षकांनी त्यांना हटकल्यावर ते सारे महापालिकेच्या बाहेर पडले. त्यानंतर रात्री साडेसातच्या सुमारास पुन्हा एकदा हे कार्यकर्ते अंड्यांचा ट्रे घेऊन महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ घोषणाबाजी करत आले. आयुक्तांच्या गाडी महापालिकेच्या बाहेर येताच त्यावर अंडी फेकून मारण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला होता. मात्र प्रकरण पोलिसांना कळताच पोलिसांचा छोटा फौजफाटा तेथे दाखल झाला व त्यांनी कार्यकर्त्यांचया हातातील अंड्याच्या ट्रेसह कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले. त्यामुळे आयुक्तांवर येणारा बाका प्रसंगापासून आयुक्त वाचले.

निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यामध्ये प्रहार संघटनेचे शहराध्रक्ष अजित कुलकर्णी, शहर संघटक जमीर शेख, शहर कार्राध्रक्ष खालीद मणिरास आदी उपस्थित होते.