Tue, May 21, 2019 04:48होमपेज › Solapur › स्वच्छ भारत मिशन अंतर्गत डस्टबीन वाटप सुरु 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत डस्टबीन वाटप सुरु 

Published On: Jul 06 2018 4:00PM | Last Updated: Jul 06 2018 3:59PMसोलापूर : प्रतिनिधी 

 स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सोलापुरातील प्रत्येक कुटुंबियांना डस्टबीन वाटप करण्यात येणार आहे. त्याची सुरवात आज प्रभाग क्रमांक सोळा मधून झाली. 

महापालिकेच्या झोन क्रमांक सात येथे नागरिकांना ओल्या कचऱ्यासाठी हिरवा आणि सुक्या कचऱ्यासाठी निळा असे दोन डस्टबीन नगरसेविका श्रीदेवी फुलारे, पुनम बनसोडे,  मिनाक्षी कंपली यांच्या हस्ते वाटण्यात आले.

सोलापूरात स्वच्छ भारत अंतर्गत महानगरपालिकेने सुमारे एक लाख डस्टबीन सेटची (हिरवा व निळास्टबीन)   खरेदी केली आहे. त्यातील २५ हजार डस्टबीन १५ दिवसापूर्वी महापालिकेत दाखल झाले आहेत. त्यातील काही डस्टबीनचे प्रातिनिधीक  स्वरुपात  वाटप करण्यात आले आहे. 

परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची : फुलारी 

ओला व सुका कचरा वेगळा ठेवण्यासाठी दोन डस्टबीन देण्यात आले आहेत.  नागरिकांनी कचरा रस्त्यावर न टाकता डस्टबीनमध्ये साठवावा ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवावा. महापालिका प्रशासकीय पातळीवर स्वच्छ सोलापूरसाठी बरेच प्रयत्न करत आहे. मात्र तितकीच जबाबदारी नागरिकांचीही असून त्यांनी ही जबाबदारी चोख पार पाडली तर स्वच्छ आणि सुंदर सोलापूरचे स्वप्न साकार होइल.  असे मत  नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी केले.