Tue, Nov 13, 2018 03:47होमपेज › Solapur › राईनपाडा हत्याकांडांच्या निषेधार्थ माळशिरसमध्ये कडकडीत बंद

राईनपाडा हत्याकांडांच्या निषेधार्थ माळशिरसमध्ये कडकडीत बंद

Published On: Jul 05 2018 1:42AM | Last Updated: Jul 04 2018 8:22PMमाळशिरस : तालुका प्रतिनिधी 

 राईन पाडा (ता. साक्री) जि. धुळे येथे झालेल्या हत्याकांडात नाथपंथी डवरी समाजाचे  दादाराव भोसले, भारत माळवे, भारत भोसले व आप्पा इंगोले व राजू भोसले मृत्युमुखी पडले होते. या घटनेच्या निषेधार्थ आज ( दि. 4 रोजी ) माळशिरस तालुका जनसेवा संघटना, ओबीसी सेल व नाथपंथी डवरी समाजाच्यावतीने माळशिरस बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून शहरात सर्वत्र कडकडीत बंद होता. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.

मंगळवेढा तालुक्यातील पाच जण भिक्षा मागण्यासाठी राईन पाडा (ता. साक्री) येथे गेले होते. यावेळी गावात मुले पळवणारी टोळी आल्याच्या अफवेने या गावातील गावकर्‍यांनी या लोकांना बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली. या मृत्यूस व हत्याकांडास जबाबदार असणार्‍या गावकर्‍यांवर कडक कारवाई करुन त्यांना फाशीची शिक्षा करावी व त्यांच्या कुटुंबाला संरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. 

या निवेदनावर तालुका अध्यक्ष जॉन्टी शिंदे, रमेश शिंदे, विजय बाबर, सुरेश शिंदे, गणेश शिंदे, लखन साळु खे, आण्णा शिंदे, भाऊसाहेब जगताप आदीच्या सह्या आहेत. सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या पद्मजा देवी मोहीते -पाटील यांनी माळशिरस येथे येऊन नाथ पंथी डवरी समाज्यातील लोकांची भेट घेऊन घटनेची माहीती घेतली.