Mon, Sep 16, 2019 17:49होमपेज › Solapur › वरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू

वरवडेतील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

टेंभुर्णी : प्रतिनिधी

माढा तालुक्यातील वरवडे येथील विहिरीत बुडून माय-लेकीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. या दोघी मंगळवारपासून बेपत्ता होत्या. राणी सोमनाथ गायकवाड (वय 26) व त्यांची लहान मुलगी पिऊ सोमनाथ गायकवाड (2) अशी विहिरीत बुडून मृत झालेल्या माय-लेकीची नावे आहेत. 

वरवडे येथील राणी सोमनाथ गायकवाड व त्यांची लहान मुलगी पिऊ सोमनाथ गायकवाड या माय-लेकी मंगळवारी दुपारी साडेचार वाजल्यापासून बेपत्ता होत्या. त्यांची शोधाशोध सुरू होती. 

दरम्यान, बुधवारी सकाळी या दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. विहिरीतील पाणी उपसून त्यांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला.  मृत्यूचे कारण अस्पष्टमाय-लेकीचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून आत्महत्या की घातपात याविषयी तर्कवितर्क करण्यात येत आहेत. टेंभुर्णी पोलिस अधिक तपास करीत आहेत. या घटनेने हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे.