Wed, Nov 21, 2018 05:45होमपेज › Solapur › आषाढी यात्रेपूर्वीच पितळ उघडे; गटारीचे पाणी थेट चंद्रभागेत(Video)

आषाढी यात्रेपूर्वीच पितळ उघडे; गटारीचे पाणी थेट चंद्रभागेत(Video)

Published On: Jul 16 2018 8:30PM | Last Updated: Jul 16 2018 8:30PMपंढरपूर : प्रतिनिधी

संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा  सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर येत असतानाच मागील महिन्याभरात केलेल्या यात्रा नियोजनाचे पितळ उघडे पडले आहे. तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांडपाणी चंद्रभागा नदीत जात असल्याचे कबूल केले. मात्र त्यानंतरही या प्रश्नावर प्रशासन फोल ठरले आहे. 

चंद्रभागा तिरावरील उद्धव घाटावरील ड्रेनेजचे चेंबर तुंबल्याने या ड्रेनेजमधील मैला मिश्रित पाणी या उद्धव घाटावरून नदीच्या पात्रात वाहत असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाविकांतून नाराजी व्यक्त होत आहे. उध्दव घाट हा महत्त्‍वाचा घाट असून भाविक याच घाटावरून वाळवंटात उतरतात. याच घाटावरील ड्रेनेज फुटल्याने संपूर्ण उद्धव घाटावर मैला मिश्रित पाणी वाहते आहे. नाईलाजाने याच दुर्घंधीयुक्‍त पाण्यातून वारकरी भाविकांना चंद्रभागेच्या स्नानासाठी जावे लागते आहे.