Mon, Nov 19, 2018 08:30होमपेज › Solapur › ऋषभचा ‘पार्थिव’ होऊ नये : किरमाणी

ऋषभचा ‘पार्थिव’ होऊ नये : किरमाणी

Published On: Mar 10 2018 10:37PM | Last Updated: Mar 10 2018 8:57PMनवी दिल्‍ली : युुवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याला देशांतर्गत स्पर्धेत खेळून परिपक्‍व होऊ द्यावे, कोवळ्या वयात त्याच्यावर मोठा भार टाकून त्याचा पार्थिव पटेल करू नका, असे मत भारताचे माजी दिग्गज यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनी व्यक्‍त केले. पार्थिव पटेलला अतिशय कमी वयात राष्ट्रीय संघात निवडण्यात आले, पण त्याला त्या वयात आंतरराषट्रीय सामन्यांचा दबाव झेलता आला नाही, त्यामुळे त्याची कामगिरी चांगली झाली नाही, त्याच दरम्यान महेंद्रसिंह धोनीचा क्रिकेट विश्‍वात उदय झाल्याने पार्थिवची कारकीर्द फुलण्याआधीच कोमेजली. तसाच प्रकार ऋषभ सोबत होऊ नये. कारण प्रत्येक जण सचिन तेंडुलकर नसतो. सचिनने 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करून यशस्वी होऊन दाखवले होते. ऋषभला धोनीचा वारसदार बनवायचा असेल तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमधून अजून तावूनसुलाखून निघाले पाहिजे, असेही किरमाणी यांनी म्हटले आहे.