Wed, Apr 24, 2019 11:48होमपेज › Solapur › अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात वाटली गाजरं

अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात वाटली गाजरं

Published On: Feb 12 2018 5:33PM | Last Updated: Feb 12 2018 5:45PMसोलापूर : प्रतिनिधी

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विरूध्द सोलापुरात अनोखे आंदोलन करण्यात आले. या महामंडळाच्या अधिकारी व बँक कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरोधात देशसेवा संघटनेतर्फे गाजर वाटप व रास्ता रोको करण्यात आला.

महामंडळ बचाव कृती समिती संलग्न देशसेवा व पीपीएन यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, सात रस्ता येथे गेटसमोर सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता गाजर वाटप व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी ‘हम सब एक है, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच व्यावसायिक प्रशिक्षण आजपर्यंत कोणाला आणि कधी दिले. बीज भांडवल व थेट कर्ज योजनेचा लाभ कोणा-कोणाला दिला. राष्ट्रीय मागासवर्गीय वित्तीय व विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ कोणा- कोणाला दिला, आदी घोषणा देण्यात आल्या. 

महामंडळ बचाव कृती समितीने यातील अधिकार्‍यांवर राजकीय वजन असणार्‍यांची प्रकरणे लवकर पास केली जात असल्याचा आरोपही केला आहे. तसेच त्यांनी यावेळी, 2016-17 मधील बीज भांडवल योजनेतील 203 प्रकरणे त्वरीत बँकांनी मंजूर करण्याचे आदेश द्यावेत. किती जणांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले, आदींची सविस्तर माहिती महामंडळाकडे मागितली आहे. 

यावेळी आंदोलनात सतीश मुदगुल, संतोष मुदगुल, अक्षय मुदगुल, नितीन घोडके, किरण घोडके, ऋषीकेश मुदगुल, अजय जाधव, बाळा पवार, सचिन शिंदे, रोहित पवार, विजय दांडेकर, धर्मराव दूधभाते आदी उपस्थित होते.