Sat, Sep 22, 2018 06:42होमपेज › Solapur › धुळ्यातील हत्येच्या निषेधार्थ मंगळवेढा बंद (Video)

धुळ्यातील हत्येच्या निषेधार्थ मंगळवेढा बंद (Video)

Published On: Jul 03 2018 10:40AM | Last Updated: Jul 03 2018 10:40AMमंगळवेढा : तालुका प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील नाथपंथी डवरी समाजाच्या भिक्षा मागून जगणाऱ्या लोकांच्या धुळे जिल्ह्यात झालेल्या हत्येच्या घटनेनंतर सोमवारी सर्व पक्षीयांनी बैठक घेत मंगळवारी मंगळवेढा बंदची हाक दिली. या हाकेला शहरात मोठा प्रतिसाद मिळाला असुन मोठे व्यापारी लहान व्यावसायिक छोटे दुकानदार हातगाडे आदी व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवत या घटनेचा मूक निषेध व्यक्त केला आहे. 

शहरातील चोखामेळा चौक नेहमी गजबजलेला असतो मात्र आज शुकशुकाट असुन दामाजी चौक, शिवप्रेमी चौक, मुरलीधर चौक, शनिवार पेठ, मारवाड़ी गल्ली, बोराळे नाका, सांगोला नाका, बस स्टॅण्ड परिसरात कृषी उत्प्नन बाजार समिती परिसरातील सर्व दुकाने बंद आहेत. 

सोमवारी सांयकाळ सहा वाजता सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी शहरात प्रमुख बाजारपेठेत फिरून बंदचे आवाहन केले होते. वाहतूक सुरळीत सुरु असुन व्यवहार मात्र बंद आहेत.
आज दुपारी एक वाजता दामाजी पुतळा परिसरातून मूक पदयात्रा निघणार असुन बाजार चौकातील मारुतीच्या पटांगणात शोकसभा आणि श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.