होमपेज › Solapur › धनगर समाजाकडून आरक्षणासाठी मुंडण आंदोलन

धनगर समाजाकडून आरक्षणासाठी मुंडण आंदोलन

Published On: Aug 06 2018 1:56AM | Last Updated: Aug 05 2018 9:08PMपंढरपूर : प्रतिनिधी 

धनगर आरक्षणासाठी आज धनगर समाजाच्या वतीने चंद्रभागा नदी पात्रात सरकारचा दशक्रिया करून काही समाज बांधवांनी मुंडण करून आंदोलन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या फोटोला चंद्रभागा नदीपात्रात चप्पला जोडे मारून फोटोचे नदीपात्रात विसर्जन केले.

महाराष्ट्रामध्ये धनगड ही जातच अस्तित्वात नाही. घटनेमध्ये ‘र’ चा ‘ढ’ झाल्याने आजपर्यंत आरक्षणापासून वंचित रहावे लागले आहे. त्यामुळे या अक्षरांत बदल करून धनगर आरक्षण मिळावे यासाठी धनगर समाजाच्यावतीने पंढरपूर तहसीलदार कार्यालयासमोर मंगळवार, 7 ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.

तसेच 30 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे धनगर समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला असल्याचे समाज नेते संतोष सुळे यांनी यावेळी सांगितले. या आंदोलनावेळी धनगर समाजातील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.