Thu, Nov 15, 2018 09:53होमपेज › Solapur › स्पर्धेमुळे व्यक्‍तिमत्त्व तयार होते : मोहिते-पाटील

स्पर्धेमुळे व्यक्‍तिमत्त्व तयार होते : मोहिते-पाटील

Published On: Feb 06 2018 10:57PM | Last Updated: Feb 06 2018 9:08PMअकलूज : तालुका प्रतिनीधी

जीवनात संघर्षाला मोठे स्थान असून प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. स्पर्धेमुळे व्यक्‍तिमत्त्व घडत असते. स्पर्धेमुळे आत्मविश्‍वास व जिद्द निर्माण होते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे अवाहन शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले शिवरत्न शिक्षण संस्था व शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टच्या  महाविद्यालयीन वार्षिक स्पर्धेच्या ‘झील 2018’ चे उद्घाटन मोहिते-पाटील यांचे हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या मध्ये ग्रीनफिंगर्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, विजयसिंह मोहिते-पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग अँण्ड रिसर्च, राजसिंह मोहिते-पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेेजमेंट टेक्नालाजी, मदनसिंह मोहिते-पाटील सायन्स महाविद्याल मंगळवेढा या महाविद्यालयांचा या मध्ये सहभाग आहे. या वेळी  सहसचिव शिवदास शिंदे, संचालक आप्पा गायकवाड, अश्रफ शेख, महावीर गांधी, संजय जावळे, प्राचार्य विलास निंबाळकर, प्रसाद पाटील, संजय साळुंखे, टी.बी.मिसाळ आदी उपस्थित होते.