Fri, Jul 19, 2019 13:29होमपेज › Solapur › हिंगणी मध्यम प्रकल्पात सापडला कुजलेला मृतदेह 

हिंगणी मध्यम प्रकल्पात सापडला कुजलेला मृतदेह 

Published On: Mar 13 2018 9:50PM | Last Updated: Mar 13 2018 9:50PMवैरागःप्रतिनिधी  

हिंगणी मध्यम प्रकल्पामध्ये एका पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. ही बाब मंगळवारी दुपारी समोर आली असली तरी मृत्यू महिनाभरापूर्वी झाला असून घातपात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. याबाबत वैराग पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

याबाबतची वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, हिंगणी मध्यम प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये उपळे दुमाला गावाच्या हद्दीत मंगळवारी दुपारी शेळ्या राखणारा व्यक्ती शेळ्यांना घेऊन पाणी पाजण्यास गेला असता त्याला पाण्यात गोणपाट दिसले. त्यातून मृत व्यक्तींचा पाय बाहेर आलेला त्याला आढळला. त्याने तत्काळ ही घटना निदर्शनास आणून दिली. 

त्यानंतर वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर, सपोनि रविंद्र खांडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत व्यक्ती साधारण पस्तीस ते चाळीस वयाचा असून त्याचा खून झाला असण्याची शक्यता पोलिस सुत्रांकडून वर्तवण्यात येत आहे.

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ही घटना सुमारे महिनाभरापूर्वी घडली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून मृतदेहाची ओळख न पटल्याने अज्ञाता विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार घातपाताचा असल्याने एकच खळबळ उडाली आहे. ह्या घटनेचा पुढील तपास सपोनि रविंद्र खांडेकर हे करीत आहेत.