Sun, Jul 21, 2019 16:15
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › करोडो रुपयांची मोबाईल टॉयलेटस् भंगारात

करोडो रुपयांची मोबाईल टॉयलेटस् भंगारात

Published On: Feb 02 2018 11:46PM | Last Updated: Feb 02 2018 11:15PMपंढरपूर : प्रतिनिधी

करोडो रुपयांचा निधी खर्चून पंढरपूर शहरात उभा केलेली 20 मोबाईल टॉयलेटस् वापराअभावी भंगारात निघाली आहेत. ही टॉयलेटस् नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे ती वाहून गरजेच्या ठिकाणी नेली जात नाहीत आणि त्यामुळे त्यांचा वापरही होत नाही. 

यात्रा काळात येणार्‍या भाविकांची संख्या आणि शहरात शौचालयाची आवश्यकता असणार्‍या ठिकाणी आणि नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्रात शासन तीर्थक्षेत्र विकास समिती व महाराष्ट्र शासन देहू, आळंदी, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम विभागीय आयुक्‍त पुणे यांनी फिरत्या शौचालयांसाठी एक कोटी रुपये खर्च करून शहरात ठिकठिकाणी फिरते शौचालय असावेत या उद्देशाने 2010  साली वीस फिरते शौचालय पंढरपूर नगरपालिकेला दिली होती. सध्या या वीस पैकी तीन शौचालय ठिकाणी  आहेत बाकी सर्व दुरुस्ती अभावी कासेगाव येथील शंभर एकर परिसरात पडून आहे.

शहरातील चंद्रभागा वाळवंट, संतपेठ, केंद्रेकर महाराज मठ, गोपाळपूर, गजानन महाराज महाराज मठ पिच्छाडी, अंबाबाई पटांगण, माळीवस्ती, विस्थापीत नगर, उंच विठोबा या भागात ठेवण्यात आली होती. परंतु सध्या ही शौचालये फिरण्याच्या आणि वापरण्याच्या अवस्थेत नाहीत. कारण अनेक शौचालयांची चाके , टायर, बसण्याचे सीठ, पाण्याच्या ठाक्या, सौरऊर्जेची प्लेट, दरवाजे, नळ चोरीला गेली आहेत. अशी 17 फिरते शौचालय कासेगाव येथे असलेल्या शंभर एकर परिसरात पडून आहेत. नगरपालिका प्रशासन याकडे अजूनही लक्ष देत नाही. पालिकेने तातडीने या फिरत्या शौचालयांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.