Sun, May 26, 2019 20:40होमपेज › Solapur › दरोड्याच्या तयारीतील दोघांना साहित्यासह अटक

दरोड्याच्या तयारीतील दोघांना साहित्यासह अटक

Published On: Jan 23 2018 1:10AM | Last Updated: Jan 22 2018 11:02PMबार्शी : तालुका प्रतिनिधी 

रात्रगस्तीदरम्यान दरोड्याच्या तयारीतील अल्पवयीन युवकासह दोघांना पाठलाग करून गावठी कट्टा व वाहनासह  ताब्यात घेतल्याची, तर तिघे दरोडेखोर पळून गेल्याची घटना काल, 21 रोजी  रविवारी रात्री बार्शी शहरातील लातूर रस्त्यावरील हॉटेल शीतलसमोर घडली. 

गणेश शुभाष खापे (वय 25, रा. कसबा पेठ, कळंब) असे दरोड्याच्या तयारीत असलेल्या व गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून अन्य तिघे दरोडेखोर पळून गेले. दोघांना बार्शी न्यायालयात उभे केले असता एकास 25 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली असून  एका अल्पवयीन तरुणाची बालगृहात रवानगी करण्यात आली आहे. 

काही संशयित लोक पांढर्‍या रंगाच्या कारमधून लातूर रोडवरून बार्शी शहराच्या दिशेने येत असल्याची माहिती बार्शी पोलिसांना खबर्‍यामार्फत मिळाली. त्यानुसार लातूर रस्त्यावरील शीतल हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा लावला असता ही कार तेथे आली.कारची तपासणी करण्यासाठी थांबवली असता कारमधून पाच जण पळून जात  असताना दोघांना पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्या कमरेला एक गावठी बनावटीचा कट्टा, चटणीची पूड, मोबाईल हँडसेट मिळून  आला.