Sat, Sep 22, 2018 03:38होमपेज › Solapur › डॉक्‍टरकडून रुग्णावर वस्‍तार्‍याने हल्‍ला

डॉक्‍टरकडून रुग्णावर वस्‍तार्‍याने हल्‍ला

Published On: Jan 06 2018 3:40PM | Last Updated: Jan 06 2018 3:40PM

बुकमार्क करा

नातेपुते : वार्ताहर 

फोंडशिरस (ता. माळशिरस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍याने रुग्णावर सलूनमध्ये जाऊन वस्तार्‍याने हल्‍ला केला. या घटनेने ग्रामस्थ संतप्त झाले असून या डॉक्टरवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

मारकडवाडी येथील विलास पांढरे (वय ५२) हे फोंडशिरस येथील पीएचसीमध्ये उपचाराकरिता गेले होते. यावेळी त्यांनी त्‍यांना असणारी समस्या डॉक्‍टर व त्‍यांची तेथेच कार्यरत असणार्‍या पत्‍नीसमोर सांगितली.यावेळी परस्परांमध्ये गैर समजूत होवून रुग्णालयात वाद झाले.

यावेळी डॉक्‍टर रागात असल्याने विलास पांढरे तेथून निघून गेले. पांढरे सलून दुकानामध्ये निघून गेल्याची माहिती डॉ. दाते यांना कळाली. यावेळी त्यांनी सलूनमध्ये जाऊन पांढरे यांच्यावर सलून दुकानातील वस्‍तारा घेऊन हल्‍ला केला. यामध्ये पांढरे जखमी झाल्याने त्‍यांनी नातेपुते पोलिसात गुन्‍हा नोंद केला आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज दाते व रुग्ण विलास पांढरे यांनी पोलिसात त्यांच्यातील भांडणे व गैरसमज मिटले असल्याचे सांगितल्याने त्‍यानुसार पोलिसात नोंद करण्यात आली आहे. या घटनेबाबत गावातील ग्रामस्थांनी डॉक्टर विरोधी तक्रार केली आहे. ग्रामस्थांना कायदा हातात घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्या असून तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. पुढील तपास सपोनि राजकुमार भुजबळ, पो.हे.कॉ. स्वरुप शिंदे करीत आहेत.