Sun, Aug 25, 2019 08:38होमपेज › Solapur › सोलापूर : राज्य उत्पादनच्या अधिकाऱ्यास डांबून ठेवले

सोलापूर : राज्य उत्पादनच्या अधिकाऱ्यास डांबून ठेवले

Published On: Feb 03 2018 2:30PM | Last Updated: Feb 03 2018 2:30PMवैराग : प्रतिनिधी

 बेकायदेशीर हातभट्टी दारु वाहतूक करणाऱ्याना अटकाव करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहाय्यक फौजदारास सतरा अठरा जणांनी मिळून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजता भांतबरे -जामगाव रोडवर (ता. बार्शी) घडली आहे. त्यानंतर त्यांना यमाई लमाण तांड्यांमध्ये डांबून ठेवून मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सिध्दराम बिराजदार असे मारहाण झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून ते कुर्डुवाडी विभागात कार्यरत आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बिराजदार यांची मुक्तता केली त्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचे.बोलले जात आहे.