Sat, Feb 16, 2019 23:04होमपेज › Solapur › पॉलिटेक्निकच्या प्राचार्यावर गुन्हा

पॉलिटेक्निकच्या प्राचार्यावर गुन्हा

Published On: Jan 12 2018 1:57AM | Last Updated: Jan 11 2018 10:36PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

विनापरवानगी कॉलेज परिसरातील मोठ्या वृक्षाच्या फांद्या तोडल्याप्रकरणी एस.ई.एस. पॉलिटेक्निकच्या प्राचार्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
एस.ई.एस. पॉलिटेक्निकचे प्राचार्य राजमाने (रा. महावीर चौक, वकास नगर, सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. याबाबत सहायक वृक्ष अधिकारी अजयकुमार गणपत चव्हाण (वय 32, रा. माजी सैनिक नगर, विजापूर रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

20 नोेव्हेंबर 17 यादिवशी एस.ई.एस. पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील पाच  लिंब, दोन गुलमोहर, एक  रेन्ट्री, एक पिंपळ झाड या झाडांच्या फांद्या प्राचार्य राजमाने यांनी महानगरपालिकेच्या वृक्ष अधिकार्‍याची कोणतीही पूर्व परवानगी न घेता तोडल्या. याबाबत महापालिकेकडे तक्रार मिळाल्यानंतर चौकशी करून वृक्ष अधिकार्‍याकडून याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करून गुन्हा दाखल केला. पोलिस नाईक रजपूत तपास करीत आहेत.