होमपेज › Solapur › न्यायालयाची फसवणूक, पोलिस हवालदारास १४ जणांवर गुन्हा 

न्यायालयाची फसवणूक, पोलिस हवालदारास १४ जणांवर गुन्हा 

Published On: May 03 2018 11:55AM | Last Updated: May 03 2018 11:55AMसोलापूर : प्रतिनिधी

बनावट कागदपत्रे तयार करून दिवाणी न्यायालयात खोटा दावा दाखल करून न्यायालयाची फसवणूक केल्‍याप्रकरणी पोलिस हवालदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दगडू राठोड असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्‍या पोलिस हवालदाराचे नाव आहे. सचिन शाम उकरंडे यांच्या फिर्यादीवरून राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राठोड यांच्यासह इतर १४ जणांनी शेतीची बनावट कागदपत्रे तयार केली आणि खोटी शेतजमीन दाखविल्‍याचे उकरंडे यांनी दिलेल्‍या फिर्यादीत म्‍हटले आहे. तसेच तरुणास मारहाण करून ठार मारण्याची धमकीही या संशयीत आरोपींनी दिल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे. 

राठोड हा सोलापूर शहर गुन्हे शाखेत कार्यरत असून, उकरंडे यांच्या तक्रारीवरून राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. 

Tags :  solapur police, crime,   people