Thu, Jan 17, 2019 18:32होमपेज › Solapur › 7 मार्चपासून नगरसेवक शिंदे यांचे उपोषण

7 मार्चपासून नगरसेवक शिंदे यांचे उपोषण

Published On: Feb 28 2018 11:47PM | Last Updated: Feb 28 2018 8:44PMपंढरपूर : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरणाचा ठराव सभागृहात मंजुर आहे. 19 फेब्रुवारीपर्यंत काम सुरू करण्याचे आश्‍वासन देऊनही त्याची पूर्तता केली नाही त्याबद्दल नगरसेवक प्रशांत शिंदे यांनी 7 मार्चपासून उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. 

येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याचे अंदाजपत्रक, आराखडा, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सभागृहात हा ठराव मंजूर झाला आहे. मात्र अजूनही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक प्रशांत शिंदे यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावेळी  नगराध्यक्षा सौ. साधना भोसले यांनी चार दिवसात प्रत्यक्षात कामाला सुरुवात करू असे आश्‍वासन दिले होते. मात्र त्यानंतर 10 दिवस झाले तरीही कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे बुधवारी नगरसेवक प्रशांत शिंदे यांनी मुख्याधिकार्‍यांना लेखी पत्र देऊन येत्या 7 मार्च रोजी नगरपालिकेच्या मुख्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.