Fri, Nov 16, 2018 08:45



होमपेज › Solapur › नगरसेवक व माजी उपमहापौर यांच्यासह १५ जणांवर गुन्हा

नगरसेवक व माजी उपमहापौर यांच्यासह १५ जणांवर गुन्हा

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:16PM

बुकमार्क करा





सोलापूर : प्रतिनिधी

पैगंबर  जयंतीदिवशी  रात्री   साईनाथनगर भाग 2 येथे डॉल्बी लावण्याच्या कारणावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख व राष्ट्रवादीचे माजी उपमहापौर हारुण सय्यद यांच्यासह 15 जणांविरुद्ध विजापूर नाका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जावीद मुस्तफा कल्याणी (वय 20, रा. एमआयडीसी, साईनाथनगर भाग 2) याच्या फिर्यादीवरून वहाब सय्यद, शोएब सय्यद, हारुण सय्यद व त्यांची दोन मुले, अनिस सय्यद, मोहसीन मुजावर, महिबूब मुजावर व इतर काहीजण  यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मोहसीन कासिम मुजावर (28, रा. साईनाथनगर  भाग  2) याच्या फिर्यादीवरुन तौफिक शेख, इरफान फनिबंद, जाविद कल्याणी, मोहसीन कल्याणी, शाकिर सगरी, त्याचे भाऊ व इतर काहीजण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पैगंबर जयंतीनिमित्त शनिवारी रात्री साईनाथनगरात पोलिसांनी येऊन डॉल्बी बंद करण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरून व पोलिसांना सांगितले म्हणून वहाब सय्यद, शोएब सय्यद, हारुण सय्यद यांनी येऊन जावीद कल्याणी यास लाकडाने, हत्याराने मारहाण करून जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक करंडे तपास करीत आहेत.

मोहसीन मुजावर याच्या फिर्यादीनुसार शनिवारी रात्री डॉल्बी लावण्याच्या कारणावरून तौफिक शेख व इतरांनी मुजावर यास शिवीगाळ करून  तुमचा बाप येऊ द्या, तुम्हाला दाखवितो असे म्हणून हाताने व लाथाबुक्क्यांने मारहाण करुन जखमी केले म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक राठोड तपास करीत आहेत.