होमपेज › Solapur › स्वराज्यनिर्मितीत राजमाता जिजाऊ यांचे मोठे योगदान : शैला गोडसे

स्वराज्यनिर्मितीत राजमाता जिजाऊ यांचे मोठे योगदान : शैला गोडसे

Published On: Jan 13 2018 1:15AM | Last Updated: Jan 12 2018 10:05PM

बुकमार्क करा
सोलापूर ः प्रतिनिधी

राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार केले. सुराज्यनिर्मितीमध्ये जिजाऊंचा मोठा पुढाकार होता, असे मत जिल्हा परिषद सदस्या शैला धनंजय गोडसे यांनी केले. 

जिल्हा परिषदेमध्ये शुक्रवारी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 

याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, कार्यकारी अभियंता बळीराम नागणे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी किरण पराग, व्याख्याता व जि.प. सदस्या शैला धनंजय गोडसे, सुनंदा राजेगावकर, यांची प्रमुख उपस्थित होती. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, कार्यकारी अभियंता बळीराम नागणे, उपअभियंता पंडित भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. 

मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषदेच्यावतीने शैला गोडसे व सुनंदा राजेगावकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते.

यावेळी बोलताना गोडसे म्हणाल्या, जिजाऊंनी शिवरायांना स्फूर्ती व प्रेरणा दिली. त्यांचा आत्मविश्‍वास वाढविला. त्यांनी सती प्रथेला विरोध केला. जिजाऊंनी शिवरायांच्या रूपात सुराज्याचे स्वप्न पाहिले होते. 
पर्यवेक्षिका सुनंदा राजेगावकर म्हणाल्या, जिजाऊ या विचारवंत होत्या. त्यांचा विचार आपल्या पाल्यांवर करावा. जिजाऊ  कर्तृत्ववान होत्या. राजनीती, शस्त्रविद्याची माहिती त्यांना होती. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे कर्मचारी व मराठा सेवा संघ जिल्हा परिषद कर्मचारी संघाचे अविनाश गोडसे, अनिल जगताप, सुहास चेळेकर, आप्पासाहेब भोसले, अनिल पाटील, सोनाली कदम, सुनीता भसारे, बाळासाहेब गुटाळ, सूर्यकांत मोहिते, सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सूत्रसंचालन सुधाकर सुसलादे यांनी केले, तर आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मानले.