Thu, Apr 25, 2019 03:54होमपेज › Solapur › काँग्रेसचा सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल

काँग्रेसचा सत्ताधार्‍यांवर हल्लाबोल

Published On: Jun 26 2018 1:16AM | Last Updated: Jun 25 2018 11:17PMसोलापूर : प्रतिनिधी 
महापालिकेतील सत्ताधार्‍यांकडून पाणीपुरवठा, नाले सफाई, दिवाबत्ती, शिक्षण, आरोग्य अशा सर्व स्तरांवर अनागोंदी कारभार सुरू असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आठही झोन कार्यालयांना टाळे ठोकून हल्लाबोल आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनाने शहरातील नागरी सुविधांची बाब चव्हाट्यावर आली आहे. 

सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकाच वेळी शहरातील आठही विभागीय कार्यालये गाठली. काही कार्यालये उघडी होती. त्यांना बंद करून त्याला टाळे ठोकले, तर जी कार्यालये उघडी नव्हती, त्या कार्यालयानांही त्यांनी स्वतःचे कुलूप ठोकून आंदोलन केले. सुमारे तासभर आंदोलन झाल्यावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून चावी काढून घेत
 विभागीय कार्यालय उघडण्यात आले. त्यामुळे सुमारे साडेबारापर्यंत शहरातील एकाही विभागीय कार्यालयाचे काम सुरु होऊ शकले नव्हते.

काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले हे विभागीय कार्यालय क्रमांक पाच येथे होते, तर इतर ठिकाणी काँग्रेसच्या विविध संघटना आणि सेलच्या पदाधिकार्‍यांनी व नगरसेवकांनी नेतृत्व करत टाळे ठोकले. आंदोलनात शहर अध्यक्ष प्रकाश वाले, महापालिकेचे गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक बाबा मिस्त्री, रियाज हुंडेकरी, फिरदोस पटेल, परवीन इनामदार, विनोद भोसले, श्रीदेवी फुलारे, वैष्णवी करगुळे, प्रवीण निकाळजे, अनुराधा काटकर, लोकसभा अध्यक्ष सुदीप चाकोते, शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महिला अध्यक्षा हेमाताई चिंचोळकर, नलिनीताई चंदेले, मेघनाथ येमुल, दत्तू बंदपट्टे, जेम्स जंगम, सैफन शेख, शौकत पठाण, राहुल वर्धा, केशव इंगळे, माणिकसिंग मैनावाले, तिरुपती परकीपंडला, शशिकांत जाधव, मनिष गडदे, युवराज जाधव, संजय गायकवाड, महेश घाडगे, सुमन जाधव, अशोक कलशेट्टी, मन्सूर गांधी, कोमोरो सय्यद, शाहू सलगर, रियाज मोमीन, डॉ. आप्पासाहेब बगले आदी उपस्थित होते.

दीड वर्षात मतभेदाशिवाय काहीच नाही : वाले

महापालिकेत सत्तांतर होऊन दीड वर्ष झाले. या दीड वर्षामध्ये विकास ामे करणे लांबच मात्र होता तो पाणीपुरवठा, दिवाबत्ती, ड्रेनेज साफसफाई, रस्ते या मूलभूत सोयींचीही वाट लागली आहे. केवळ दोन मंत्र्यांतील हेवेदावे आणि गट-तट यामध्येच महापालिकेचे दिवस चालले असून त्यामुळे सोलापूरचा विकास खुंटत आहे, असे मत काँग्रसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी व्यक्त केले.