Tue, Nov 20, 2018 01:31



होमपेज › Solapur › सिव्हिलमध्ये सयामी जुळ्या बालिकेची प्रकृती स्थिर

सिव्हिलमध्ये सयामी जुळ्या बालिकेची प्रकृती स्थिर

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 11:37PM



सोलापूर : प्रतिनिधी

दोन तोंड, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका आणि धड मात्र एक, अशा प्रकारे सयामी जुळी बालिका सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नुकतीच जन्मली आहे. त्यावर येथील डॉक्टर संशोधन करून यापुढे अशा घटना टाळता येतील यावर संशोधन करत आहेत. या बाळीची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घडलेली घटना अशी की, सोलापुरातील एक महिला प्रसूतीसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात गुरुवारी दाखल झाली. प्रसूतीकळा येत असल्याने त्यांची प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी केली. त्यामध्ये दोन तोंडे असलेले बाळ त्या महिलेस असल्याचे डॉक्टरांना आढळले. डॉक्टरांनी त्या मातेला आणि त्यांच्या कुटुंबाला याची माहिती दिली. त्यामुळे त्यांची मानसिक तयारी  झाली होती. त्यामध्ये त्या मातेने स्त्री जातीच्या सयामी जुळ्या बाळाला जन्म दिला.  त्या बाळाचे वजन तीन किलो 900 ग्रॅम  आहे. दोन तोंडे, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका असलेल्या बाळाला शरीर मात्र एकच आहे. जी लाखातील एक आणि सिव्हिल हॉस्पिटलमधील पहिलीच घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  

या बाळाच्या कुटुंबीयांची ओळख सिव्हिल प्रशासनाने गुप्त ठेवली आहे. अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली स् त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विद्या तिरनकर, बालरोग चिकित्सा विभागातील डॉ. एस. व्ही. सावस्कर, बालरोग चिकित्सक डॉ. सुदर्शन चक्रे, बालरोग शल्यचिकित्सक डॉ. रवी कंदलगावकर हे सयामी जुळे बाळ आणि आईवर उपचार करीत आहेत.