Fri, Apr 26, 2019 15:27होमपेज › Solapur › संविधान प्रत जाळल्याप्रकरणी धरणे आंदोलन 

संविधान प्रत जाळल्याप्रकरणी धरणे आंदोलन 

Published On: Aug 10 2018 8:32PM | Last Updated: Aug 10 2018 8:32PMमोहोळ : वार्ताहर 

भारतीय संविधानाची प्रत जाळल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुका भारिप बहुजन महासंघाच्या वतीने ११ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष आकाश सरवदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ०९ ऑगस्ट रोजी दिल्ली (जंतर मंतर) काही समाज कंठकांनी भारतीय संविधानाची प्रत जाळून संविधान विरोधी घोषणा दिल्या होत्या. त्याचा विडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या विडीओ मध्ये काही लोक एकत्र आले असून त्यांनी भारतीय संविधानाची प्रत जाळल्याचे दिसत आहे. शिवाय सदरचा जमाव संविधान विरोधी आणि आरक्षण विरोधी घोषणा देत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे सर्व भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेचा मोहोळ तालुका भारिप बहुजन महासंघाने निषेध केला असून संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाज कंठकांवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा. तसेच आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीसाठी ११ ऑगस्ट रोजी मोहाळ तहसील कार्यालयाच्या समोर जिल्हाध्यक्ष पोपट सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. 

या बाबतचे निवेदन मोहोळ तहसीलदार व पोलीस प्रशासनास देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष पोपट सोनवणे, पंकज कांबळे, सुरज ओहोळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.