Tue, Jul 16, 2019 09:56होमपेज › Solapur › स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पुण्यात वसतिगृहाची सोय करणार : शिंदे 

स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पुण्यात वसतिगृहाची सोय करणार : शिंदे 

Published On: Dec 22 2017 1:30AM | Last Updated: Dec 21 2017 9:14PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी  

एमपीएससी, युपीएससी स्पर्धा परीक्षा देणार्‍या सोलापुरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे सोलापूर जिल्हा परिषदेच्यावतीने वसतिगृह बांधणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली. सोलापुरातील अनेक विद्यार्थी हे एमपीएससी व युपीएसएसी स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तसेच त्यांची तयारी करण्यासाठी पुणे येथे जातात. या विद्यार्थ्यांना तेथे राहण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. पुणे येथे इतर जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आहेत. मात्र सोलापुरातील विद्यार्थ्यांसाठी  वसतिगृहाची सोय नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्यावतीने पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्यात येणार असून यासाठी शासनाकडे जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे. पुणे येथे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा ठराव 28 डिसेंबर रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत करून तो शासनाकडे पाठाविण्यात येणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली.

वसतिगृहाच्या बांधकामासाठी  निधी जिल्हा परिषद उभारणार असून यामुळे सोलापूर जिल्ह्यातील  स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना  पुणे येथे  राहण्यासाठी चांगली सोय होणार आहे

सोलरसाठीचा निधी इतर विकासकामांसाठी सोलरसाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी असून तांत्रिक अडचणीमुळे या योजनेसाठी प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे हा निधी खर्च होणार की नाही यांची शंका असून निधी संपूर्ण खर्च व्हावा यासाठी  हा निधी इतर विकासकामांसाठी खर्च करण्याचा विचार असल्याचे यावेळी संजय शिंदे यांनी सांगितले.
यशवंतनगर वसतिगृह बचत गटांना चालवायला देण्याचा विचार यशवंतनगर येथे मुलींसाठी वसतिगृह बांधण्यात आले आहे. मात्र ते काही कारणामुळे अद्याप सुरू झाले नसून हे वसतिगृह सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असून हे वसतिगृह बचत गटांना चालवायला देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली.