Sun, Sep 23, 2018 02:09होमपेज › Solapur › संवादातून विद्यापीठ विकास : करमाळकर

संवादातून विद्यापीठ विकास : करमाळकर

Published On: Dec 11 2017 1:35AM | Last Updated: Dec 10 2017 9:54PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

शैक्षणिक संकुलांसह समाजात परस्परांतील संवाद कमी होत चालला आहे. हा संवाद अधिक दृढ करून सोलापूर विद्यापीठ विकासाला बळ देऊ, असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर यांनी केले.

सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू म्हणून डॉ. करमाळकर यांनी रविवारी दुपारी पदभार घेतला. त्यावेळी ते बोलत होते. माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले, माजी कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार, कुलसचिव गणेश मंझा, मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर उपस्थित होते. डॉ. करमाळकर म्हणाले की, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मालदार यांनी आजपर्यंत चांगले काम केले आहे. पुणे विद्यापीठातील चांगले उपक्रम सोलापूर विद्यापीठात राबविण्याचा प्रयत्न करणार आहे. सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांना फायदा होईल. पुणे विद्यापीठ व सोलापूर विद्यापीठात परस्पर सहकार्याचे काही करारही करण्याचा मानस आहे. नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया होईपर्यंत चार महिन्यांचा वेळ लागेल, असे डॉ. करमाळकर यांनी सांगितले.