Thu, Jan 24, 2019 05:40होमपेज › Solapur › महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण

महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अपहरण

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 8:55PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

विजापूर रस्त्यावरील सोनी महाविद्यालयात अकरावीत शिकणारा सौरभ ऊर्फ आबा संभाजी कापसे (वय 16, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) हा 29 डिसेंबरपासून बेपत्ता आहे. याप्रकरणी विजापूर नाका पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. 

सौरभ हा जुळे सोलापुरातील राजशेखर कमळे यांच्या घरी इतर विद्यार्थी मित्रांसोबत भाड्याने  राहतो. शुक्रवार, 29 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास पेन्सिल आणतो म्हणून तो घराबाहेर गेला. अद्याप तो परत आला नाही. त्याचे वडील संभाजी कापसे आणि कुटुंबीयांनी सर्व मित्रांकडे व नातेवाईकांकडे शोधाशोध करूनही तो सापडला नाही. सौरभ हा गेल्या सहा महिन्यांपासून सोलापुरात राहत आहे. 

याप्रकरणी विजापूर नाका पोलिसात फिर्याद देण्यात आली आहे. तो अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अरुण फुगे आणि त्यांचे सहकारी सौरभचा शोध घेत आहेत.