Tue, Apr 23, 2019 02:06होमपेज › Solapur › शिवकालीन नाण्यांतून इतिहासाचा जागर

शिवकालीन नाण्यांतून इतिहासाचा जागर

Published On: Feb 19 2018 10:54PM | Last Updated: Feb 19 2018 10:31PMअक्‍कलकोट : प्रतिनिधी

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील शेकडो शिवराई (नाणी) व पोस्ट तिकीट विजय दत्तात्रय शिंदे यांनी जमवून आपला छंद जोपासला.शिवकालीन चलन हे 1964 मध्ये तांब्याच्या पत्र्यावर श्री शिवछत्रपती ही नाव मुद्रीत केलेली नाणी चलन म्हणून वापरात आणली. सदरील नाणे अंदाजे पाऊण तोळे असून त्या नाण्यावर जी आणि शि अक्षरे आढळून येत होते. ते नाणे स्वराज्याचे पहिले नाणे म्हणून ओळखले जायचे. शंभर वर्षे आपण परकीय चलन वापरत होतो. तेव्हा सन 1565 मध्ये विजयनगरचा सम्राट सदाशिव राय हा बहामनी सत्तेकडून पराभूत झाला होता आणि ही कोंडी छत्रपती शिवाजी महाराजांनी नवीन चलन आणून फोडली. त्यानंतर महाराजांनी शिवराई चलन अस्तित्वात आणली आणि ते 1860 पर्यंत पेशवाईच्या अस्तापर्यंत वापरली.

6 जून 1674 मध्ये शिवराज्याभिषेकासमयी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्ण होन हे चलन अस्तित्वात आणले. पण हे चलन केवळ राज्याभिषेकापुरतेच वापरले नंतर ते चलनात आणले गेले नाही. शिवाजी महाराजांच्या मृत्युसमयी स्वराज्याच्या तिजोरीतील झालेल्या मोजणी संदर्भात 4 लाखांहून अधिक नाणी आढळल्या. यामध्ये इतर कंभार, होराई, अजूनराई, रामचंद्रराई, पुतण्या, अच्युतराई, देवराई, सहनगरी, गुप्तचंद्र, धारवाडी, सातलाम्या, अफराजी, उल्फक्री, महंमदशाही, त्रिसूत्री, कुणगोटी, मोहरा, पाठशाही, इंद्रनाम्या, व्यंकटराई, कावेरीपाक, दिलदरी, रामनाथपुरी, प्रलघटी, जरमानाईक, चंद्रावरी अशा सुवर्ण नाणी आढळून आल्या होत्या. निर्मिही होन, पुतळी, सुवर्ण नाणी यापैकी होन वजनाने 2.728 ग्रॅम होते. होनाची किंमत 3 ते 4 रुपये, पुतळीची किंमत 5 रुपये, मोहोरची किंमत 15 रुपये होती. सुवर्ण होनावर सूर्य, चंद्र, बेलाचे पान, वृक्ष, खंडा, तलवार असे या नाण्यावर चिन्हे असत. इतिहाकाराच्या मते शिवराईवर हिंदूमय वर्तुळ आहे. 

संग्रहात विविध किंमतीची नाणी

माझ्याकडे जगातील शंभर देशांच्या वेगवेगळ्या किंमतीची नाणी आहेत. भारतातील सर्व संस्थानच्या नाण्या व नोटा, जगातील 120 देशातील कागदी चलन, 250 देशातील पोस्ट तिकीट, सातवाहन काळाची नाणी, ईस्ट इंडिया कंपनीची नाणी, इंग्रज काळातील नाणी, शहाजीराव गायकवाड यांच्या काळातील, हैदराबाद संस्थानातील, ग्वाल्हेर नाणी, महाराणा प्रताप, आदिलशाही नाणी अशा विविध प्रकारची नाणी आहेत. रशियाचे सुमारे 100 वर्षांपूर्वीचे कागदी चलन आहेत. भारतात तयार झालेल्या 1 हजारांहून अधिक काड्यापेट्यांचा संग्रह आहे. गेल्या 42 वर्षांपासून सदर नाणे, तिकीट पोस्ट व विविध देशातील चलन गोळा करण्याचा छंद जोपासत आलेलो आहे. 
- विजय शिंदे, छंद जोपासक, अक्कलकोट.