Sat, Apr 20, 2019 23:51होमपेज › Solapur › गाळ्यांच्या प्रश्नावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांना निमंत्रण 

गाळ्यांच्या प्रश्नावर चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांचे व्यापाऱ्यांना निमंत्रण 

Published On: Jul 10 2018 9:06PM | Last Updated: Jul 10 2018 9:09PMसोलापूर : प्रतिनिधी 

ई टेंडर व्दारे गाळे भाडेतत्त्वार न देता आहे त्याच व्यापाऱ्यांना भाडेवाढ करुन गाळे द्यावेत या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी सुरु केलेले आंदोलनाची दखल अखेर मुख्यमंत्र्यानी घेतली आहे. त्‍यानुसार मुख्यमंत्र्यांनी १२ तारखेला व्यापाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले असल्याची माहिती मनपा मेजर व मिनी गाळेधारक संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक यांनी दिली आहे.

ई टेंडरव्दारे गाळे भाडेतत्वावर देउ नयेत यासाठी गाळेधारकांनी आंदोलन सुरु केले होते. धरणे आंदोलन आणि त्यानंतर महापालिकेवर हजारोंचा धडक मोर्चा यामुळे महापौर व सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी त्याची दखल घेत मुख्यमंत्र्याशी चर्चा करुन या प्रश्नावर मार्ग काढू असे अश्वासन महापौरानी आंदोलकांच्या सभेत दिले होते. मात्र अकरा तारखे पर्यंत मुख्यमंत्र्यांची वेळ दिली नाही तर सोलापूर बंद करणार अशी भूमिका आंदोलनाचे नेतृत्व करणारे माजी आमदार नरसय्या आडम यांनी घेतली होती. मात्र मुख्यमंत्र्यांचा चर्चा करण्याचे १२ तारखेला निमंत्रण दिल्याचा निरोप आज १२ जुलै रोजीच आला त्यामुळे सोलापूर बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. 

मुख्यमंत्र्याबरोबर चर्चा करण्यासाठी माजी आमदार आडम यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक, गटनेते चेतन नरोटे, गटनेते आनंद चंदनशिवे, गटनेते लक्ष्मण जाधव, केतन शहा आदींचे शिष्टमंडळ उद्या मुंबईला रवाना होणार आहे.